मान्सून महाराष्ट्रात दाखल
बहुप्रतिक्षित मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. सोलापूरच्या दक्षिणी पट्ट्यात आज मान्सूनचे आगमन झाले. त्याबरोबरच कोकण पट्ट्यात मान्सून सक्रिय झाला असून काही ठिकाणी पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
काल दक्षिण-पश्चिम तामिळनाडू मध्य तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या पट्ट्यात तसेच मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आसाम नागालँड या राज्यांच्या काही भागात मान्सूनने दस्तक दिली होती. मान्सूनच्या योग्य प्रवास झाल्याने आज सोलापूरच्या पट्ट्यात मान्सून दाखल झाला. सोलापूरच्या हरनाई, रामागुंडम, मगदालपुर या भागात मान्सून आगमन झाले आहे. तसेच कोकणातही मान्सून दाखल झाला असून अनेक भागात पाऊस पडत आहे. मान्सूनच्या वाटचालीला पुढील चोवीस तासात अनुकूल वातावरण असल्याने आता दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला जाईल, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.